'व्हॅलेंटाइन डे' च्या दिवशी आस्ताद आणि कविता बांधणार 'लग्नगाठ'

'पुढचे पाऊल' ने दिले नात्याला नवे वळण

'व्हॅलेंटाइन डे' च्या दिवशी आस्ताद आणि कविता बांधणार 'लग्नगाठ'

२०२१ ह्या वर्षात मराठी सेलिब्रटी कपल्सच्या लग्नाला जणू काही उधाणच आलेले आहे. मानसी नाईक, अभिज्ञा भावे त्यानंतर सिद्धार्थ - मिताली ह्या जोडीच्या लग्नानंतर आता आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटीलच्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. छोट्या पडद्यावरील हे सुप्रसिद्ध सेलिब्रिटी कपल येत्या व्हेलेंटाईन डे दिवशी लग्नगाठ बांधण्यास सज्ज होत आहेत. 


आस्ताद आणि स्वप्नाली अनेक वर्षापासून चांगले मित्र आहेत. ह्या दोघांनी एकत्रपणे एका मालिकेचा पायलट एपिसोड शूट केला होता. त्या पहिल्याच कार्यक्रमात आस्ताद आणि स्वप्नाली बहीण - भाऊ च्या व्यक्तिरेखेत होते. त्यानंतर जवळपास तीन चार वर्षांनी हि दोघे 'पुढचे पाऊल' या मालिकेत पुन्हा एकत्र आली. या मालिकेत स्वप्नालीची एंट्री मालिकेच्या एका विशेष वळणावर झाली होती. दरम्यान, सुरुवातीला या दोघांची मैत्री झाली आणि काहीच महिन्यात आस्ताद स्वप्नालीच्या प्रेमात पडला होता. आस्तादने स्वप्नालीला त्याबददल जेव्हा सांगितले तेव्हा तिने त्याला जवळजवळ वर्षभरानंतर होकार कळवला होता. मजेशीर गोष्ट म्हणजे या दोघांच्या प्रेमप्रकरणाची खबर स्वप्नालीच्या घरी नव्हती. आस्तादने बिग बॉसच्या घरात तिच्याबद्दल सांगितल्यामुळे, स्वप्नालीच्या घरी त्यांचे हे गुपित उघड झाले. मग, पुढे काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे !! 

 


स्वप्नाली आणि आस्तादच्या नात्याला दोघांच्याही कुटुंबियांनी सहमती दिली, आणि आता ही जोडी यावर्षी १४ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत.  या जोडीच्या वैवाहिक आयुष्यासाठी आमच्या starambassador.in कडून शुभेच्छा !!