लग्नानंतर मानसी नाईकचा पती प्रदीप खरेरासोबत रोमँटिक म्युझिक व्हिडिओ

लग्नानंतर मानसी नाईकचा पती प्रदीप खरेरासोबत रोमँटिक म्युझिक व्हिडिओ

सागरिका म्युझिक, वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर या कलाकारांच्या सुरेख गाण्याची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली आहे. निलेश मोहरीर यांनी ‘वाटेवरी मोगरा’ या गाण्याची सुंदर रचना केली आहे. हे गाणे नवीनच लग्न झालेल्या मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरावर चित्रित करण्यात आले असल्यामुळे हा म्युझिक व्हिडीओ अजूनच खास झाला आहे. यावर्षी १९ जानेवारीला मानसीनं आंतरराष्ट्रीय बॉक्सर आणि अभिनेता असलेल्या प्रदीप खरेरासोबत लग्न केलं आणि या म्युझिक व्हिडीओतून ते पहिल्यांदाच एकत्र झळकली आहेत.

निलेश मोहरीरचं सुमूधर संगीत, श्रीपाद जोशी यांचे सुंदर शब्द, वैशाली आणि स्वप्नीलचे अगदी सुंदर गायन, यासोबत सागरिका दास यांनी दिग्दर्शित केलेला ग्लॅमरस म्युझिक व्हिडीओ आणि मानसी-प्रदीपचा रोमँटिक अंदाज ही या म्युझिक व्हिडीओची खास वैशिष्ट्य आहेत. सागरिका म्युझिक सोबतच निलेश यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. श्रीपाद जोशी या आगामी प्रतिभावान गीतकारानं या गाण्याचे शब्द लिहिले आहेत.

वैशाली आणि स्वप्नील ने सागरिका म्युझिकसाठी आतापर्यंत १०० हुन अधिक गाणी गायली आहेत आणि त्यात हे गाणं पहिल्या १० मध्ये नक्कीच येईल. गाण्याचा ऑडिओ जर घरच्याच कलाकारांसोबाबत असेल तर व्हिडिओच्या बाबतीतही काही वेगळं नाही. या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन सागरिका दास यांनी केले आहे (ज्यांनी ५० हुन अधिक म्युझिक व्हिडिओंचे दिग्दर्शन केले आहे ज्यात हळू हळू चाल , सावली उन्हामध्ये , मस्त चाललंय आमचं, राधा राधा या सारख्या व्हिडिओज चा समावेश आहे) जो मानसी नाईक जी एक घरचीच कलाकार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सागरीकाच्या अनेक व्हिडिओज मध्ये झळकलेली मानसी नाईक आता पूर्णपणे नवीन अवतारात "वाटेवरी मोगरा"मध्ये दिसणार आहे.

 

मानसी नाईक चा आत्तापर्यंतचा हा पहिलाच रोमँटिक म्युझिक व्हिडिओ आहे, आणि तो देखील पती प्रदीप खरेरासोबत असल्यामुळे हा म्युझिक विडिओ अजूनच खास झाला आहे.