जागतिक महिला दिन : प्रार्थना बेहरेकडून खास अंदाजात शुभेच्छा

फोटोंच्या माध्यमातून केले कष्टकरी महिलांचे प्रतिनिधित्व

जागतिक महिला दिन : प्रार्थना बेहरेकडून खास अंदाजात शुभेच्छा
instagram

८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आज सर्वत्र महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात येत आहे. स्त्री जीवनातील महत्व या दिनाच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो. मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने देखील या दिनाचे महत्व जपत जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील सर्व सामान्य महिलांना शुभेच्छा देण्यासाठी खास फोटो शूट केले. 

हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत तिने,  या फोटोला ‘जागतिक महिलादिनी आम्हांला त्या कणखर आणि खंबीर महिलांना सलाम करावासा वाटतो ज्या आपल्या कष्टाने रोज घाम गाळून छोट्या प्रमाणावर का होईना देशाच्या आर्थिक उन्नतीतमध्ये भर घालतात आणि नेटाने आपले घर आणि देश चालवतात आशा सर्व कष्टकरी रणरागिनी महिलांना माझा सलाम’ असं खास कॅप्शनही दिलं आहे.

या फोटोशूट द्वारे प्रार्थनाने समाजातील तळागाळातील मेहनती आणि कष्टाळू स्त्रियांचे प्रतिनिधित्व करत, त्यांचे महत्त्व पटवून दिले आहे. प्रार्थनाचा हा हटके अंदाज प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे.