स्वप्ना वाघमारे-जोशी ‘फक्त मराठी वाहिनी’च्या प्रोजेक्ट हेड!

२२ मार्चपासून ‘सप्तपदी मी रोज चालते’

स्वप्ना वाघमारे-जोशी ‘फक्त मराठी वाहिनी’च्या प्रोजेक्ट हेड!
स्वप्ना वाघमारे-जोशी ‘फक्त मराठी वाहिनी’च्या प्रोजेक्ट हेड!

मालिका आणि चित्रपट क्षेत्रात विशेष लौकिक असलेल्या प्रसिद्ध दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी या 'फक्त मराठी वाहिनी'च्या प्रोजेक्ट हेड म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. स्वप्ना वाघमारे ह्या यशस्वी मालिका आणि चित्रपट दिग्दर्शिका असल्यामुळे,  'फक्त मराठी' वाहिनीवरील मालिकांना त्यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. आजवर विविध आशयघन चित्रपट – कार्यक्रमांद्वारे रसिकांचं मनोरंजन करणारी 'फक्त मराठी वाहिनी’ आता दैनंदिन मालिकांच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मागील आठवड्यात सुरू झालेल्या 'साईबाबा श्रद्धा आणि सबूरी' या आध्यात्मिक मालिकेनंतर 'सप्तपदी मी रोज चालते’ ही कौटुंबिक मालिका येत्या २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 'साईबाबा श्रद्धा आणि सबूरी'  या अध्यात्मिक मालिकेला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, 'सप्तपदी मी रोज चालते’ या मालिकेला देखील रसिक प्रेक्षक पसंत करतील असा विश्वास आहे. या मालिकेत अमृता आणि संजू यांची कहाणी पहायला मिळणार आहे. या दोघांच्या माध्यमातून पवार आणि थोरात या दोन कुटुंबाची कथाही यात आहे. अमृताला आपल्या आईप्रमाणे कर्तबगार आणि वडीलांप्रमाणे समजूतदार पती हवा आहे. कालांतराने तिच्या आयुष्यात संजूची एंट्री होते, पण त्याला काहीही न करता फक्त ऐशोआरामात जीवन जगायचं आहे. अशी ही जोडी भविष्यात 'सप्तपदी' कशी चालणार या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या प्रत्येक भागागणिक मिळणार आहे. या मालिकेतील प्रत्येक करॅक्टर वास्तविक जीवनातील खरे खुरे रंग दाखवणारे असल्याने प्रत्येकाला ही मालिका आपल्याच घरातील कथा असल्यासारखी वाटेल. टेलिव्हिजन क्षेत्रातील आघाडीच्या ‘टेल अ टेल मीडिया प्रा. लि.’ या संस्थेच्या जितेंद्र गुप्ता आणि महेश तागडे यांनी 'फक्त मराठी वाहिनी'साठी या मालिकेची निर्मिती केली आहे

 

 

'सप्तपदी मी रोज चालते’ या मालिकेत अमृता आणि संजू यांची कहाणी पहायला मिळणार आहे. या दोघांच्या माध्यमातून पवार आणि थोरात या दोन कुटुंबाची कथाही यात आहे. अमृताला आपल्या आईप्रमाणे कर्तबगार आणि वडीलांप्रमाणे समजूतदार पती हवा आहे. कालांतराने तिच्या आयुष्यात संजूची एंट्री होते, पण त्याला काहीही न करता फक्त ऐशोआरामात जीवन जगायचं आहे. अशी ही जोडी भविष्यात 'सप्तपदी' कशी चालणार या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या प्रत्येक भागागणिक मिळणार आहे. या मालिकेतील प्रत्येक करॅक्टर वास्तविक जीवनातील खरे खुरे रंग दाखवणारं असल्यानं प्रत्येकाला ही मालिका आपल्याच घरातील कथा सांगणारी असल्यासारखं वाटेल. आज इतर वाहिन्यांवर सुरू असलेल्या कौटुंबिक मालिकांच्या तुलनेत 'सप्तपदी'मध्ये काहीसं वेगळं कथानक पहायला मिळणार असून, त्यातही अनेक कंगोरे असल्यानं मालिकेत येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी पुरेसे ठरणारे आहेत. टेलिव्हिजन क्षेत्रातील आघाडीच्या ‘टेल अ टेल मीडिया प्रा. लि.’ या संस्थेच्या जितेंद्र गुप्ता आणि महेश तागडे यांनी 'फक्त मराठी वाहिनी'साठी या मालिकेची निर्मिती केली आहे.


ऋणानुबंध, मानो या ना मानो, कॅप्टन हाऊस, कलश, कुटुंब, कहानी घर घर की, तीन बहुरानिया, देवयानी, संस्कार धरोहर अपनोंकी अश्या ट्रेंड सेटर लोकप्रिय मालिकांसोबतच धमाधम्म, मितवा, फुगे, लाल इष्क, सविता दामोदर परांजपे, तुला कळणार नाही, माधुरी इत्यादी ग्लॅमरस सुपरहिट मराठी सिनेमांचं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या स्वप्ना वाघमारे जोशी ‘सप्तपदी मी रोज चालते’ या मालिकेसाठी प्रोजेक्ट हेड म्हणून काम पहात आहेत. या मालिकेबाबत स्वप्ना वाघमारे जोशी म्हणाल्या की, "'सप्तपदी मी रोज चालते’च्या माध्यमातून एक आशयघन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजच्या कुटूंब पध्दतीवर भाष्य करणाऱ्या या मालिकेत एक गुलाबी लोभासवाणी प्रेमकथाही पहायला मिळणार आहे. एक नवी कोरी जोडी या मालिकेचं मुख्य आकर्षण ठरणार आहे. 'फक्त मराठी वाहिनी'चा मनोरंजनाचा वारसा जपणारी 'सप्तपदी मी रोज चालते’ प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करेल यात शंका नाही".