धर्म म्हणजे काय मला शिकवू नका’, अभिनेता गश्मीर महाजनीचं ट्रोलर्सला सडेतोड प्रत्युत्तर

धर्म म्हणजे काय मला शिकवू नका’, अभिनेता गश्मीर महाजनीचं ट्रोलर्सला सडेतोड प्रत्युत्तर

गश्मीरने काही दिवसांपूर्वी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुलासोबतचा फोटो शेअर केला होता.  त्या फोटोत गश्मीर त्याच्या मुलासोबत धमाल करत त्याची शेंडी ओढताना दिसतोय. यात गश्मीर आणि त्याचा मुलगा व्योम दोघांनीही पांढरं धोतरं गळ्यात रुद्राक्षाच्या माळा परिधान केल्या आहेत. यावरुन कमेंट सेक्शनमध्ये गश्मीरला खरी खोटी सुनावली आहे. काहींनी या फोटोचा संबंध मुंज या धार्मिक विधीशी जोडला. मुलाची शेंडी ओढून या विधीचा अपमान करत असल्याचा आरोप काहींनी करायला सुरुवात केली. 

या सगळ्या प्रकारानंतर आता गश्मीरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले आहे. “मुळात ही त्याची शेंडी नाही. तो फक्त दोन वर्षांचा आहे. त्याची मुंज झालेली नाही. उन्हाळा म्हणून केस कापले आहेत. बापाला आपल्या मुलाची शेंडी ओढण्याचा पूर्ण अधिकार असतो. पण आपण बहुतेक आपल्या धर्माचे शिलेदार आहात. पूर्ण माहिती नसताना बेजबाबदार कमेंट करु नका.” अशा शब्दात त्याने समस्त ट्रोलर्स वर्गाला सुनावलं आहे.

प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये  गश्मीर महाजनी ‘शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.