सुयशने या गोष्टींमधून घेतला काढता पाय !

सोशल मिडियापासून अभिनेता सुयश टिळकने पत्करला 'दुरावा'

सुयशने या गोष्टींमधून घेतला काढता पाय !

मराठीचा छोटा आणि मोठा पडदा ते अगदी वेब सीरिज मध्येही झळकलेल्या सुयश टिळकने फार कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. सुयश सोशल मिडीयावर आपल्या लक्षवेधी पोस्टमुळे देखील प्रसिद्ध आहे. त्याचे निसर्गप्रेम सोशल मिडीयाच्या पोस्टमधून अनेकवेळा दिसून आले आहे, नेचर फोटोग्राफी पासून ते अगदी स्वयंपाककौशल्यासाठी देखील सुयश टिळक सरस आहे. 

लॉकडाऊन काळातही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होता. मात्र, आता त्याने या सर्वांमधून दुरावा पत्करला आहे. यामागचं कारण अद्यापही स्पष्ट झालेली नाही. 

Click here to visit post

सोशल मीडियावरील या पोस्टच्या माध्यमातून सोशल जगतालाच अलविदा केल्याचं पाहायला मिळत आहे. खलील गिब्रान यांच्या ओळी पोस्ट करत त्यानं जणू त्याच्याही मनीचे भाव इथं मांडले आहेत. त्याच असं लिहिलंय, 'प्रवास करा आणि कुणालाही सांगू नका. एक निखळ अशी प्रेमकहाणी जगा, कुणालाही सांगू नका, आनंदी आयुष्य जगा कुणालाही सांगू नका..... माणसं चांगल्या गोष्टींचा नाश करतात'.