अभिनेत्री परिणीती चोप्रा साकारणार 'सायना'

बॅडमिंटनपट्टू सायना नेहवालवर आधारित बायोपिकचा टीजर प्रदर्शित

अभिनेत्री परिणीती चोप्रा साकारणार 'सायना'
 

अभिनेत्री परिणीती चोप्राची मुख्य भूमिका असलेला ‘सायना’ या बायोपिकचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. बॅडमिंटनपट्टू सायना नेहवालचा जीवनप्रवास या सिनेमातून मांडण्यात आला आहे. या टीझरमधून परिणीतीने सायनाची भूमिका चोख निभावल्याचं दिसून येतंय.

 

 

परिणीतीच्या आवाजात या टीझरची सुरुवात होते. काही भारतीय घरांमध्ये होणारा मुला-मुलींमधील भेदभावाबद्दल ती सांगतेय. “मुलींना घरकामं शिकवली जातात तर मुलांना मात्र शिक्षण दिलं जातं. मुलगी अठरा वर्षांची झाली की तिचं लग्न लावून दिलं जात.माझ्या बाबतीत मात्र असं घडलं नाही.” असं ती या टीझरच्या सुरूवातीला सांगते.

या भूमिकेसाठी परिणीतीने मोठी मेहनत घेतली आहे. परिणीतीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फोटो अपलोड केले होते. यात तिने सकाळी ५ वाजताच ती दिवसाची सुरुवात करत असल्याचं म्हंटलं होतं. वर्कआउट करुन सकाळी ६ वाजताच ती सराव सुरु करत होती. असं म्हंटलं आहे. अमोल गुप्ते दिग्दर्शित सायना हा सिनेमा २६ मार्चला प्रदर्शित होणार आहे. २०२१ सालच्या ऑलिंपीक स्पर्धांमध्ये सायना नेहवालने कांस्य पदक पटकावलं आहे. तसचं आपल्या उत्कृष्ट खेळाने अनेक स्पर्धांमध्ये बाजी मारली आणि अनेक नवे विक्रम तिने गाठले आहेत. सायनाच्या याच कामगिरीची झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे.