सारा जेव्हा डेन्टिस्टकडे जाते तेव्हा...

अक्कल दाढ काढतानाचा अतरंगी व्हिडियो झाला व्हायरल !

सारा जेव्हा डेन्टिस्टकडे जाते तेव्हा...

बॉलिवूडची स्टार अभिनेत्री सारा अली खान सोशल मिडीयावर आपल्या अतरंगी स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. ती प्रत्येकवेळी काहीना काही विनोदी गोष्टी शेयर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. तिचे रेग्युलर अपडेटदेखील चाहते आवर्जून पाहत असतात, नुकतीच ती तिच्या डेंटिस्टकडे गेली होती. जिथे तिने तिची अक्कल दाढ काढली, आणि याच दरम्यानचा व्हिडीओ तिने शेयसदेखील केला आहे. 

साराने आतापर्यंत अनेक विनोदी व्हिडियो शेयर केले असून त्यापैकी काही व्हिडीओ चर्चेत राहिले आहेत. साराने नुकताच शेयर केलेला हा  व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहे. अक्कल दाढ काढताना आणि काढल्यानंतरचा हा कॉमेडी व्हिडीओ खूप मजेशीर आहे. सारा या पोस्टमध्ये लिहीते की, "नमस्कार प्रेक्षकहो, अक्कल दाडला बाय बाय."  या व्हिडीओत ती काढलेले दात दाखवतानाही दिसतेय. साराचा हा कॉमेडी व्हिडीओ अनेकांना आवडलाय.

सारा लवकरच 'अतरंगी रे' या सिनेमातून झळकणार आहे, तिच्यासोबत अक्षय कुमार आणि धनुषदेखील आहेत.