एमएक्स प्लेयरवरील साइकोलॉजिकल थ्रिलर हॅलो मिनी सीजन २ चा टीझर प्रदर्शित

मिनीच्या आयुष्यात परत आलेली व्यक्ती कोण आहे? तिचे पुढे काय होईल हे दुसऱ्या सीजन मध्ये पाहता येईल 

एमएक्स प्लेयरवरील साइकोलॉजिकल थ्रिलर हॅलो मिनी सीजन २ चा टीझर प्रदर्शित

आयुष्यात घडलेल्या एका मोठ्या घटनेमुळे भीती, चिंता आणि असुरक्षितता सारख्या भावना लोकांच्या मनात घर करतात. आयुष्यातील एका भयानक अनुभवामुळे मनुष्य मानसिक तणावाखाली जात सतत भीतीच्या छायेखाली जगत राहतो. अशीच एक गोष्ट आहे रिवाणा बॅनर्जी उर्फ ​​मिनी - एक तरुण, स्वतंत्र मुलीची, तिच्या सामान्य आयुष्यात जेव्हा एका ‘अनोळखी’ स्त्रीचा हस्तक्षेप होतो, तेव्हा तिचे संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलून जाते.  एमएक्स ओरिजनल सीरिज हॅलो मिनी सीझन १ मध्ये मिनीच्या या काल्पनिक दुनियेची सफर प्रेक्षकांनी केली आहे, विशेष म्हणजे पहिला सीजन सुपरहिट ठरला असून, आयएमडीबी वर या सिरीजने ८.९ चे रेटिंग मिळवले आहे. ह्या सिजनच्या पहिल्या भागाचा अंत सुखकर झाला होता, मिनीच्या आयुष्यातली वादळे संपली असे दाखवण्यात आले होते. परंतु, हे वादळ दुसऱ्या सीजनमध्ये मिनीच्या आयुष्यात परत० येत आहे.   

एमएक्स प्लेयरने एमएक्स ओरिजिनल मालिका हॅलो मिनीच्या दुसऱ्या सिजनचा टिझर नुकताच लॉंच केला. सीजन २ मद्ये विनीला घाबरवणारी ती व्यक्ती नेमकी कोण? आणि मिनीसाठी ती काय घेऊन आली आहे, हे इथे सांगून तुमचा उत्साह नक्कीच कमी करणार नाहीय. 

एमएक्स ओरिजनल सीरीज हॅलो मिनी २ची गोल्डी बहलच्या रोज ऑडिओ व्हिज्युअलच्या सहकार्याने निर्मिती करण्यात आली आहे. अर्जुन श्रीवास्तव दिग्दर्शित हा सीजनचे लेखन नोव्होनवील चक्रवर्ती, वरुन आनंद शिवकुमारन आणि आयुषी घोषाल या त्रयीने केले आहे. .