भारतातल्या मोठ्या घोटाळ्यावर अजून एक वेबसीरीज

‘स्कॅम 1992’ नंतर आता ‘स्कॅम 2000'

भारतातल्या मोठ्या घोटाळ्यावर अजून एक वेबसीरीज

१९९२ सालच्या भारतातल्या स्टॉक मार्केट घोटाळ्यावर आधारीत प्रदर्शित झालेली ‘स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरीज कमी वेळात प्रचंड गाजली. हंसल मेहता यांचं दिग्दर्शन आणि त्याला प्रतिक गांधी सारख्या दर्जेदार कलाकारांने दिलेली साथ यांमुळे या सीरीजला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. ह्या घोटाळ्यानंतर भारतात आणखीन एक सर्वात मोठा झालेला घोटाळा होता, तो म्हणजे २००३ सालचा स्टॅम्प घोटाळा. आणि याच घोटाळ्यावर आधारित सोनी लिव्हने नवी वेबसिरीज घेऊन येत असल्याची घोषणा केली आहे. 

 

 

ही वेबसीरीज ‘स्कॅम १९९२’चा सिक्वेल असेल ज्याचं नाव सध्या तरी ‘स्कॅम २००३: द क्युरीयस केस ऑफ अब्दुल करीम तेलगी’ असं असल्याचं कळत आहे. या सीरीजसाठी दिग्दर्शन हंसल मेहता यांचंच आहे. हि वेबसिरीज पत्रकार संजय सिंग यांच्या ‘रिपोर्टर की स्टोरी’ या पुस्तकावर आधारीत असणार आहे. संजय यांनीच हा २००३ सालचा घोटाळा समोर आणला होता.

‘स्कॅम १९९२’ मध्ये ज्याप्रमाणे हर्षद मेहताचं आयुष्य दाखवलं होतं, त्याप्रमाणे ‘स्कॅम २००३’ मध्ये अब्दुल करीम तेलगी याचं आयुष्य दाखवलं जाणार आहे. भारतातल्या मोठ्या घोटाळ्यांपैकी एक घोटाळा असलेल्या या तेलगी प्रकरणाचे धागेदोरे भारतातल्या अनेक शहरांमध्ये पसरलेले होते. साधारणपणे 20 हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा होता. या वेबसीरीजचं लेखन अनेक मराठी चित्रपटांचे लेखक किरण यज्ञोपवित हे करत आहे. पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार संजय सिंग यांच्या मदतीने ही कथा आकार घेत आहे. याच वर्षी या वेबसीरीजचं चित्रीकरण सुरु होणार आहे.